
*जिल्ह्यातील सहा उद्योगांना महाराष्ट्र निर्यात पुरस्कार*____
देशातील २४ तज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करार या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार वितरणात कोकण विभाग अव्वलस्थानी ठरला. कोकण विभागाने ५३ पैकी २० पुरस्कार पटकावले. पुणे-वाकड येथील हॉटेल खमी टिपटॉप येथे झालेल्या कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.कोकण विभागातील उद्योग समुहांना ठाणे-६ (मे. अपर इंडस्ट्रीज लि., मे. कनेक्टवेल इंडस्ट्रीज प्रा. लि., मे. ज्योती स्टील इंडस्ट्रीज, मे. कविश फॅशन प्रा. लि., मे. सचिन्स इम्पेक्स, मे. दलाल प्लास्टिक प्रा. लि.) रत्नागिरी-६ (मे. जिलानी मरीन प्रोडक्ट, मे. कृष्णा ऍन्टी ऑक्सिडन्टस प्रा. लि., मे. अल्काय केमिकल्स प्रा. लि., मे. गद्रे मरीन एक्स्पोर्ट प्रा. लि., मे. एम. के. ए. इंजिनिअर्स ऍण्ड एक्स्पोर्टस प्रा. लि., मे. सुप्रिया लाईफ सायन्स लि. घटकाला दोन प्रवर्गात एकूण ८ सुवर्ण पुरस्कार प्राप्त झाले. सुप्रिया लाईफ सायन्सने महाराष्ट्रामध्ये अव्वलस्थान पटकावले आहे. www.konkantoday.com




