*चिपळुणात गालगुंड आजाराची साथ*______
चिपळूण:— चिपळूण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या गालगुंड आजाराची साथ पसरली आहे. लहान मुलांना या आजाराची लागण झाल्याने त्रस्त झाली आहेत. गालगुंडामुळे ताप, खोकला, घसादुखीसारखा त्रास जाणवू लागतो. यामुळे रूग्णालयातील उपचारासाठी अशा रूग्णांची संख्यादेखील वाढली आहे. दरम्यान गालगुंड हा संसर्गजन्य आजार असल्याने वेळीच खबरदारी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांमार्फत पालकांना दिला जात आहे.गालगुंड किंवा गालकुफी हा सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे होणारा आजार आहे. तसेच मुलांमध्ये लाळ ग्रंथींना होणारा विषाणूजन्य आजार आहे. बहुधा दोन्ही गालांना येणारी दुखरी सूज हे त्याचे प्राथमिक लक्षण आहे. www.konkantoday.com