*खेड, भरणेत पुन्हा मटका-जुगार अड्ड्यांवर धाड*
खेड- ____खेड शहरासह भरणे परिसरात बेकायदेशीरपणे मटका-जुगार अड्डे चालवणार्या व्यावसायिकांना पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी शनिवारी सायंकाळी पुन्हा दणका दिला. दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत १ लाख ४१ हजार २८० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भरणे येथील बापू वडापावच्या पाठिमागे असलेल्या विठ्ठल भैरी कॉम्प्लेक्समध्ये मटका-जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच शनिवारी सायंकाळच्या सुमारास पोलिसांचे पथक तेथे पोहचून धाड टाकली. या धाडीत १ लाख ३९ हजार १०० रुपये किंमतीच्या ऐवजासह चौघांना रंगेहाथ पकडले.www.konkantoday.com