उठता-बसता येईना, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली


सराटी येथे उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उठता, बसता येत नाहीय. आवाजही त्यांचा बिघडला आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.पण त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील शुक्रवारी सकाळी आमरण उपोषणाला बसले. उपोषणा दरम्यान पाणी, अन्न घेणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं होतं. आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मनातील संताप व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील सारथीच्या विद्यार्थ्यांवर भडकले. स्वतंत्र उपोषण कशासाठी करता? तुमचा मुद्दा वेगळा आहे, आरक्षणाबाबत बोला. तुमच लग्न करण्यासाठीच चालू आहे. phd केली म्हणून हुशार झालात का? गरीब मराठ्यांच्या बाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. “ज्यांना कुणबी नावाने आरक्षण नको आहे म्हणणारे कमी आहेत. सग्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करत सरकारने कायदा पारित करावा” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button