*खेडला आता प्रभारी मुख्याधिकार्यांचीही प्रतीक्षा*____
खेड:—- खेड नगरपरिषदेचा कारभार प्रभारी मुख्याधिकारीच हाकत होते. येथील नगरपरिषदेचा अतिरिक्त कारभार सांभाळणार्या चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची वसई -विरार महानगरपालिकेच्या सहआयुक्तपदी पदोन्नती बदली झाल्याने येथील नगरपरिषदेला आता प्रभारी मुख्याधिकार्याची काही दिवस प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवला जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.नगपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी हर्षदा राणे यांची कायमस्वरूपी नियुक्ती झालेली असतानाच अवघ्या ६ महिन्यातच त्यांची तडकाफडकी अन्यत्र बदली करण्यात आली. त्यांची बदली झाल्यापासून येथील नगरपरिषदेत प्रभारीचा सिलसिला कायम राहिला. www.konkantoday.com