
*रत्नागिरी नगर परिषदेकडून ४ कोटी ६५ लाखांचा थकित कर वसूल*
____रत्नागिरी नगर परिषदेची घरपट्टी वसुली आता जोर पकडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असणारी वसुली मोहीम आता अधिक तीव्र केली जाणार आहे. आतापर्यंत नगर परिषदेच्या वसुली विभागाकडून ४ कोटी ६५ लाख वसुली करण्यात आली आहे.नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार येत्या मंगळवारपासून घरपट्टी वसुलीची मोहीम कठोरपणे राबवण्यात येणार आहे. मंगळवारपासून घरपट्टी कर थकवलेल्या नागरिकांना असणारी नळपाणी कनेक्शन तोडण्यात येणार आहेत. शिवाय संपर्कात नसलेल्या वा प्रतिसाद देत नसलेल्यांच्या मालमत्ता सील केल्या जाणार आहेत. नगर परिषदेने सरत्या आर्थिक वर्षासाठी वसुलीचे १० कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान थकबाकी नसलेल्यांना जाणीव व्हावी, यासाठी शहरात दररोज घंटागाडी व वाहनाद्वारे थकीत कर भरण्यासाठी जनजागृती केली जात आहे. www.konkantoday.com