*रखडलेले बसस्थानकाचे काम लवकरच पूर्ण होणार, १८ कोटींचा निधी मंजूर करण्यात येणार*
_____गेली ६ वर्षे रखडलेले बसस्थानकाच्या कामाला आता मुहूर्त मिळाला आहे. बसस्थानकाचे हे काम जिल्ह्याबाहेरच्या कोणत्याही कंत्राटदाराला न देता आता या कामासाठी जिल्ह्यातील कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. जुन्या कंत्राटदाराने दिलेल्या वेळेत काम पूर्ण न केल्याने त्या कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. तर आता रत्नागिरीतील निर्माण समूहाला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे गेली ६ वर्षे रखडलेले काम पुढच्या वर्षात पूर्ण करण्याचे शिवधनुष्य या कंत्राटदाराला तरी झेपेल का? की पुन्हा एकदा रत्नागिरीकरांच्या नशिबी दुर्दशाच येणार अशा चर्चांना आता उधाण येवू लागले आहे.जिल्ह्यातील रखडलेल्या बसस्थानकांचे काम पूर्णत्वाकडे घेवून जाण्यासाठी आता जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाने कंबर कसली आहे. या सर्व बसस्थानकांसाठी कोट्यावधींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांचे रूपडे पालटणार आहे. आता या कामासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता या कामाला १८ कोटींचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.www.konkantoday.com