
महामार्ग बाधित इमारती पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत…
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत सावर्डे येथील बाधित झालेली पोलीस स्थानक इमारत, तलाठी कार्यालय, महापुरूष मंदिर यांच्या पुनर्बांधणीसाठी वर्षभरापूर्वी २ कोटी ७१ लाख ३७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला मात्र या इमारतीच्या पुनर्बांधणीला मुहूर्त मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत आक्रमक झाले असून पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत सावर्डे येथील सावर्डे पोलीस स्थानक इमारत, महापुरूष मंदिर व तलाठी कार्यालय बाधित झाल्यानंतर त्यांच्या पुनर्बांधणीबाबत कोणत्याच हालचाली होत नसल्याने शिवसेना तालुकाप्रमुख सावंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना सोबत घेवून राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला होता.www.konkantoday.com