
*मच्छीमार सुपुत्राची मत्स्य संशोधनात भरारी…डॉ. संतोष मेतर यांना पुरस्कार जाहीर*
__समुद्र आणि सागरी मासेमारीविषयी प्रचंड ज्ञान आत्मसात केलेले असूनसुद्धा मच्छिमार कुटुंबातील क्वचितच एखादी व्यक्ती मत्स्य विभाग किंवा मत्स्य विभागाशी संबंधित संशोधन संस्थांमध्ये मोठ्या पदापर्यंत कार्यरत असताना दिसते. रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात अभिरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. संतोष मेतर यापैकीच एक नाव की ज्यांनी मच्छिमारांच्या पारंपारिक ज्ञानाला शास्त्रोक्त आधार देत सागरी संशोधन क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत मंगळूरू-कर्नाटक येथील सोसायटी ऑफ फिशरीज ऍण्ड लाईफ सायन्सेस ऍण्ड मत्स्य महाविद्यालयाने यंदाचा उत्कृष्ट मत्स्य शास्त्राचा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.www.konkantoday.com