
पुनर्बांधणीचा प्रश्न सुटला,* *धरणफुटीतील दोषींचे काय?**ठपका ठेवलेल्या दोषींवर अद्याप कारवाई नाही*
*___तब्बल २२ जणांचा बळी आणि ५४ कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी करणार्या तिवरे धरणफुटीनंतर ४ वर्षांनी धरणाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खर्चाला मंजुरी मिळाल्याने सुटला. मात्र धरणफुटीला जबाबदार असणारे व स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी, पुनर्विलोकन चौकशी समितीने शासनाला सादर केलेल्या चौकशी अहवाल धूळखात पडला आहे. या प्रकरणी ठपका ठेवलेल्या दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे पुनर्बांधीचा प्रश्न सुटला असला तरी दोषींचे काय? असा सवाल स्थानिकांतून उपस्थित केला जात आहे.www.konkantoday.com