
जिल्हा परिषदेत महागायक/गायिका स्पर्धेचे आयोजन*
*____सन २०२३-२४ रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलनानिमित्त महागायक/महागायिका स्पर्धेचे आयोजन १४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. जे स्पर्धक भाग घेवू इच्छितात, त्यांनी आपली नावे ११ फेब्रुवारीपर्यंत द्यावी, असे आवाहन स्पर्धाप्रमुख जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.क.) श्रीकांत हावळे तसेच वित्त विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी उपसमिती प्रमुख नागेश कमलाकर बेर्डे यांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद सांस्कृतिक मंडळाकडून यंदाही विविध स्पर्धा तसेच कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ही स्पर्धा केवळ जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे कर्मचारी यांच्यासाठी आहे. तरी स्पर्धकांनी आपले नाव, हुद्दा, कार्यालयाचे नाव, गाण्याचे बोल, चित्रपटाचे नाव, संगीतकार, मूळ गायक/गायिकेचे नाव नोंदणीसाठी उपसमितीप्रमुख सहाय्यक लेखाधिकारी नागेश बेर्डे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. www.konkantoday.com