गणपत गायकवाड यांच्या मुलाला अखेर पोलिसांकडून अटक
उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर आणखी एक अपडेट समोर आली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी त्यांचा मुलगा वैभव गायकवाडसह दोघांना अटक केली आहे. मागील अनेक दिवसांपासून पोलीस दोघांचा शोध घेत होते. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनी ही कारवाई केली आहे. वैभव गायकवाडसह अटक करण्यात आलेला रणजित यादव हा आमदार गणपत गायकवाड यांचा वाहनचालक आहे.
गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात एकूण ९ जण पोलिसांच्या अटक केली आहे. हिल लाईन पोलीस स्टेशनमधील गोळीबार घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये गणपत गायकवाड यांच्या मुलाचाही समावेश दिसून आला. त्यामुळे पोलिसांकडून वैभवचा शोध सुरु होता. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
www.konkantoday.com