
कबड्डीच्या भारतीय पुरुष संघ निवड समिती सदस्यपदी चिपळूणच्या सुपुत्राची निवड
चिपळूण : दसपटीचे सुपुत्र आणि अर्जुन पुरस्कार विजेते, माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू व प्रशिक्षक अशोक शिंदे यांची 69 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाच्या निवड समिती सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे दसपटी विभागातून अभिनंदन होत आहे.
दसपटी विभागातील ओवळी गावचे ते सुपुत्र आहेत. ते आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू होते. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.
आता भारतीय संघाच्या निवड समितीवर त्यांची निवड झाल्याने मुंबई व दसपटी विभाग मंडळातर्फे त्यांचे अभिनंदन होत असून या निवडीबद्दल रामवरदायिनी देवस्थानचे अध्यक्ष प्रताप शिंदे, दसपटी विभाग क्रीडा मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण शिंदे, सरचिटणीस राज शिंदे यांच्या परिसरातील क्रीडाप्रेमींनी कबड्डीपटू व प्रशिक्षक अशोक शिंदे अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.