
श्री क्षेत्र गणपतीपुळेत माघी गणेशोत्सव
रत्नागिरी तालुक्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे माघ शुल्क १ ते मग शुल्क ७ शके १९४५ शनिवार दिनांक १०/०२/२०२४ ते शुक्रवार दिनांक १६/०२/२०२४ पर्यंत श्रींच्या मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा होणार असून या निमित्ताने मंदिर व मंदिर परिसरात उत्सवाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
यामध्ये शनिवार दिनांक १०/०२/२०२४ रोजी सकाळी ९:३० ते ११:३० श्रींची महापूजा व प्रसाद तसेच सायंकाळी ४:०० ते ७:०० गणेश याग देवता स्थापना तसेच शनिवार दिनांक १० ते बुधवार दिनांक १४ सायंकाळी ७:०० ते ७:३० सामुदायिक आरती व मंत्र पुष्प , कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त गणेशयाग पूर्णहूती रविवार दिनांक ११ रोजी सकाळी ७:०० ते १२:०० यावेळी आयोजित करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक १२ रोजी ११ ते १२ या वेळात सहस्त्र मोदक समर्पण तसेच मंगळवार दिनांक 13 रोजी सायंकाळी ४:०० वाजता श्रींची पालखी मिरवणूक व प्रदक्षिणा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक १० ते बुधवार दिनांक १४ दररोज सायंकाळी ७:०० ते ९:३० कीर्तनमाला याचे आयोजन करण्यात आले असून कीर्तनकार ह.भ.प.श्री.संदीप बुवा मांडके,पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन. .
गुरुवार दिनांक १५/०२०२४ रोजी ७:३० वाजता श्री अमोल पटवर्धन प्रस्तुत “गाणी मनातील”मध्ये गायक श्री अभिषेक पटवर्धन,सौ.मधुरा कुंभार पाध्ये,श्री अमोल पटवर्धन यांच्या आवाजातून प्रचलित भक्ती गीते, नाट्यगीते,भावगीते व देशभक्तीपर गीते यांची सुरेल गीतांची मैफिल आयोजित करण्यात आली असून सदर मैफिलीचे निवेदन प्रख्यात अभिनेते श्री.विघ्नेश जोशी हे करणार आहेत.
शुक्रवार दिनांक १६/०२/२०२४ रोजी रात्री १०:३० वाजता श्री गणेश प्रासादिक नाट्य मंडळ गणपतीपुळे प्रस्तुत उदयन ब्रम्हा लिखित विनोदी नाटक “भुलभुलैय्या” या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या उत्सवाची सांगता रथसप्तमी शुक्रवार दिनांक १६/०२/२०२४ रोजी दुपारी ११:३० ते २ या वेळेत महाप्रसादाने करण्यात येणार आहे.
कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळेचे अध्यक्ष प्राध्यापक विनायक राऊत, खजिनदार श्री.अमित मेहंदळे, सचिव श्री.विद्याधर शेंड्ये, पंच डॉ.विवेक भिडे, डॉ.श्रीराम केळकर, वेदमूर्ती श्रीहरी रानडे, श्री.निलेश कोल्हटकर यांच्यासह संस्थांचे कर्मचारी मोठी मेहनत घेत आहेत.
www.konkantoday.com