वन विभागाची कारवाई ; व्हेल माशाची उलटी तस्करी , पाठलाग करून आरोपींना पकडले
राजापूर तालुक्यामधील पाचल-ताम्हाणे रोडवरती व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार असल्याबाबत विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, यांना गुप्त माहिती मिळाली होती.व्हेल माशाला वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ सुधारीत २०२३ अंतर्गत संरक्षित करणेत आले आहे.) त्यानुसार विभागीय वन अधिकारी श्री. दिपक खाडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण आणि परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी व त्यांचा अधिनस्त अधिकारी वर्ग यांचे समवेत मौजे पाचल ताम्हाणे मार्गावर आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचनेत आला होता, आरोपी व्हेल मशाच्या उलटीची खरेदी-विक्रीचा व्यवहार करत असताना, त्यांचेवर झडप घालून आरोपीना मुद्देमालासह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींना संशय आल्याने गाडीमधील आरोपीनी मारूती सुझुकी बलेनो कार चालु करून, कारच्या भरधाव वेगाने पळ काढला व गाडीबाहेर उभे असलेले आरोपी श्री. राजकुमार सुरेश शेलार यांनी सदर ठिकाणी असलेल्या जंगलामध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पथकातील काही अधिकारी / कर्मचारी यांनी जंगलामध्ये गेलेल्या आरोपीचा पाठलाग करून त्याला जंगलाजवळच ताब्यात घेण्यात आले. तर उर्वरीत अधिकारी / कर्मचाऱ्यांनी बलेनो कारचा पाठलाग केला. परंतु बलेनो गाडीतील आरोपी भरधाव वेगाने नेर्ले मार्गे भुईबावडा गगनबावडा दिशेने वेगाने निघून गेल्यामुळे श्री. दिपक खाडे विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून, भुईबावडा गगनबावडा रस्त्यावर नाकाबंदी करून, आरोपीना ताब्यात घेणेबाबत विनंती केली. त्यानंतर लगेचच पोलीस अधीक्षक रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांनी गगनबावडा पोलीस ठाणेशी संपर्क करून,गगनबावडा जि.कोल्हापूर येथे नाकाबंदी करून, गगनबावडा येथे सदरील मारूती सुझुकी कंपनीची बलेनो क्र. MH46CH3995 गाडीसह फरार आरोपीना ताब्यात घेतले. तद्नंतर आरोपी यांची पूर्ण चौकशीकरून व वैद्यकीय तपासणीकरून पुढील चौकशीकामी परिक्षेत्र वनअधिकरी रत्नागिरी यांचे ताब्यात देण्यात आले. सदर गुन्हे प्रकरणी वनपाल राजापूर यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ व सुधारित २०२३ अन्वये प्र.गु.री.क्र.०१/२०२४ दिनांक ०४/०२/२०२४ अन्वये आरोपी ०१. श्री. राजकुमार सुरेश शेलार, वय वर्षे ३३ रा. साई आशीर्वाद सोसायटी, नांदीवली कल्याण पू. २. अकाश राजेंद्र घाडगे, वय वर्षे २९ रा. रॉयल आर्केड, सानपाडा पश्चिम, नवी मुंबई ३. रूपेश गणपत मात्रे, वय वर्षे ३९ रा. आवरे ता. उरण जि. रायगड ४. जगदीश शांताराम पोतदार वय वर्षे ४८ रा. पाचल ता. राजापूर, जि. रत्नागिरी यांचे विरूध्द गुन्हा नोंद असून सदर आरोपींना दि.०५/०२/२०२४ रोजी मा. प्रथम न्यायदंडाधिकारी राजापूर यांचे न्यायालयात हजर केले, त्यावेळी मा. न्यायालयाने आरोपीना ५ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली. त्यानंतर दि.०९/०२/२०२४ रोजी आरोपीना मा. न्यायालयाने दिनांक १६.०२.२०२४ पर्यंत न्यायालयीन कस्टडी सुनावली आहे.
www.konkantoday.com