
रत्नागिरीशहरातील माळनाका परिसरातील चार दुकाने चोरट्यांनी फोडली*
*__रत्नागिरीशहरातील माळनाका परिसरातील चार दुकाने चोरट्यांनीफोडून मुद्देमाल चोरून नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरूवारीरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली चोरी केलेल्या दुकानांमध्ये रोकड कमी असल्याने चोरट्यांच्या हाती केवळ चार हजार रूपयेच लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान चोरटेसीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसून आले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार माळनाका परिसरात नव्याने सुरू झालेल्या महाराजा व अन्य भोजनालयचोरट्यांनी फोडल्याचा पकार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आला. यावेळी काही दुकानांमध्ये सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यामध्ये 8 तारेखच्या रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरटे हे दुकानात शिरून कपाट उचकटण्याचा पयत्न करत असल्याचे दिसून आले.www.konkantoday.com