*रत्नागिरीच्या भगवती बंदर येथील समुद्रात मच्छिमार बोट बुडाल्याचा प्रकार*
__रत्नागिरीच्या भगवती बंदर येथील समुद्रात मच्छिमार बोट बुडाल्याचा प्रकार समोर घडला. मिरकरवाडा येथील हिदायत वस्ता याच्या मालकीची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बोट 50 वाव समुद्रात गेली असताना अचानक बोट पलटी होवून बुडाली. बोट बुडत असल्याचे लक्षात येताच इतर मच्छिमार नौकांनी मदतीचा हात देवू केला त्यामुळे या बोटीमधील मच्छिमारांना वाचविण्यात यश आले.शुक्रवारी दुपारी ही बोट मच्छिमार नौकांच्या मदतीने समुद्रकिनारी घेवून आणण्यात आली.दरम्यान हिदायत वस्ता यांच्या मालकीची बोट समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेली होती. वादळाच्या तडाख्यामध्ये ही बोट अचानक हेलखावे खावू लागली. अचानक आलेल्या जोराच्या लाटेमध्ये हिदायत बोट ही पलटी झाली सुदैवाने याठिकाणी असलेल्या अन्य मच्छिमार बोटींनी मच्छिमारांना वाचविण्यात यश मिळविले.www.konkantoday.com