‘रंगोत्सव’तर्फे नवनिर्माण हायमध्ये उद्या आर्ट कॉम्पिटिशन


रत्नागिरी : मुंबई येथील रंगोत्सव सेलिब्रेशन या संस्थेच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्ट कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार असून त्यासाठी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण हाय या शाळेची केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे.
रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेतर्फे गेली बारा वर्षे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले जात आहे. या संस्थेतर्फे दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेत रत्नागिरी शहरातील गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडियम स्कूल (जीजीपीस), फाटक हायस्कूल, नवनिर्माण हाय, सेंट थॉमस स्कूल, कॉन्व्हेंट स्कूल, जिंदाल विद्या मंदिर, गुरुवर्य एम. एन. जोशी इंग्लिश मिडियम स्कूल या शाळांतील सुमारे ३०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, प्राचार्या नजमा मुजावर, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख मनूश्री राणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button