*रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या ३८० अपघातात १३२ जणांचे बळी*
____रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या ३८० अपघातांनी १३२ जणांचे बळी गेले आहेत.मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर, रत्नागिरी-कोल्हापूर राज्यमार्ग व जिल्हा अंतर्गत मार्गांवर झालेले हे अपघात आहेत. यामध्ये १२० अपघात जीवघेणे ठरले आहेत. सर्वाधिक बळी मे महिन्यात गेले असून, अपघातांची संख्या ६३ आहे. त्यामध्ये २३ जणांचा मृत्यू झाला आहे. तरी गतवर्षांच्या तुलनेत अपघातामध्ये घट झाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या चौपदरीकरणाची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी कामे पूर्ण झाली असून, काही ठिकाणी अर्धवट आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण काहीसे घटले आहे. गेल्या वर्षभरात ३८० अपघात झाले असून, १३२ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.सर्वाधिक अपघात रात्री १ ते ४ या वेळेत झाले आहेत. म्हणजे झोप अनावर होऊन आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे हे अपघात झाल्याचे पुढे आले आहे. काही ठिकाणी गाडीचे टायर खराब असणे किंवा फुटणे, गाडीचे नियमित चेकअप् न करणे तसेच ब्लॅकस्पॉटवरही भरधाव वाहन चालवणे ही कारणे आहेत. भरधाव वेग हे देखील यातील एक प्रमुख कारण आहे. www.konkantoday.com