*७४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडतीचा मुहूर्त*
___रत्नागिरी जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या ७४ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी आरक्षण सोडत होेणार आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत मुदत संपणार्या, नवनिर्मित ग्रामपंचायती तसे मागील निवडणुकांमद्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होवू शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. www.konkantoday.com