*रविवार, सोमवारी रत्नागिरी ग्रंथोत्सव*
*रत्नागिरी, दि. 12 : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित रविवार दि. 11 व सोमवार दि. 12 फेब्रुवारी रोजी ‘रत्नागिरी ग्रंथोत्सव 2023’ होणार आहे. शासकीय विभागीय ग्रंथालय, खारेघाट रोड रत्नागिरी येथे होणाऱ्या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रविवारी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता ग्रंथ पूजन व ग्रंथ दिंडी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे. जीजीपीएस हायस्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शासकीय विभागीय ग्रंथालय असा या ग्रंथदिंडीचा मार्ग आहे. 11 वाजता पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. दुपारी 12.30 वाजता ‘वाचन- एक आनंदवाट’ यावर ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी, ग्रंथपाल प्रा. संतोष चतुर्भुज यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी 2.30 वाजता रयतेचा राजा ते लोकराजा या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यात प्रा. पंकज घाटे, साहित्यिक महादेव अंकलगे सहभागी होणार आहेत. सोमवार 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता स्पर्धा परीक्षा तयारी आणि प्लॅन बी या विषयावर व्याख्यान होणार आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ जस्मिन, प्रांताधिकारी जीवन देसाई, विजय सूर्यवंशी, अपर तहसीलदार राकेश गिड्डे, ग्रंथपाल किरण धांडोरे हे सहभागी होणार आहे. दुपारी 2 ते 3 वाजता ग्रंथ आणि परिवर्तन या विषयावर पत्रकार आणि साहित्यिक संजय सोनवणे यांचे व्याख्यान होणार आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते कवी अमेय धोपटकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजता यावेळेत निमंत्रित कवींचे कवी संमेलन व समारोप होणार आहे. या दोन्ही दिवशी सकाळी 9 ते रात्री 8वा. ग्रंथविक्री होणार आहे. या ग्रंथोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी दिपक झोडगे यांनी केले आहे.www.konkantoday.com