
*रत्नागिरी महासंस्कृती महोत्सवाचे रविवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्धाटन*
*रत्नागिरी, दि. 9 : – पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासन आयोजित येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात 11 ते 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रत्नागिरी महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता होणार आहे. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. उद्घाटन सोहळ्यास खासदार विनायक राऊत, खासदार सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार निरंजन डावखरे, प्रसाद लाड, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, योगेश कदम उपस्थित राहणार आहेत. 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता लेखन आणि संकल्पना अशोक हांडे यांची असणारा मराठी बाणा कार्यक्रम होणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी कोकण कला अकादमी प्रस्तृत प्रेरणा प्रोडक्शन निर्मित इतिहासाच्या पानावरचा एक सुवर्ण पान शिवबा हे महानाट्य होणार आहे. शाहीर नंदेश उमप आणि कलाकरांचा महाराष्ट्राची संस्कृती हा कार्यक्रम 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिवराज्यभिषेक आणि सांस्कृतिक परंपरा दर्शन घडवणारा रत्नकांत जगताप यांचा महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी कार्यक्रम 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर 15 फेबुवारीला अवधुत गुप्ते संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. या पाचही दिवशी रोज सायंकाळी 6.30 ते 7 वा. या कालावधीत स्थानिक लोककला नमन, जाखडी, भजन, पालखी नृत्य होणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवासाठी प्रवेश विनामुल्य असून, याचा जिल्हावासियांनी लाभ घ्यावा, त्याचबरोबर पर्यटन, कृषी, बचतगट, पुरातत्व विभागाचे दालने देखील असणार आहेत.www.konkantoday.com