
*माळनाका येथील विठ्ठल मूर्तीची नियमित पूजा, आरती करा!-वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील*
____रत्नागिरी शहरातील माळनाका येथे ५ फेब्रुवारी रोजी हजारो वारकर्यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेनुसार संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर यांच्या हस्ते संपन्न झाले. मात्र या विठ्ठलाची नियमित पूजा व आरती करा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत व नगर परिषदेला वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील यांनी केली आहे.शहरातील शिर्के उद्यानात उभारलेल्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीबाबत पत्रकारांनी हा पुतळा उद्यानात का उभारला, असा प्रश्न विचारला होता. यावर पालकमंत्री सामंत यांनी कार्यक्रमात सांगितले होते. तसेच संत साहित्य संमेलनात देखील विठ्ठल जळीस्थळी काष्ठी पाषाणी आहेे. त्यामुळे तो उद्यानात असण्यात गैर नाही, असे मत तज्ञांकडून मांडण्यात आले होते. मात्र बुधवारी १२ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या सांगता कार्यक्रमात बोलताना ह.भ.प. विठ्ठल पाटील यांनी सांगितले की, माळनाका येथील शिर्के उद्यानात उभारण्यात आलेली विठ्ठलाची मूर्ती ही चांगली बाब आहे, मात्र या मूर्तीचे पावित्र्य जपणे आवश्यक असून त्यादृष्टीने मूर्तीची रोज पूजा आणि आरती करावी अशा सूचना मी पालकमंत्री सामंत व नगर परिषद प्रशासनाला केल्या आहेत.www.konkantoday.com