
रखडलेल्या वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना मंत्री नितेश राणे यांचे पत्र
आमदार नितेश राणे यांनी कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी कोल्हापूर रेल्वे रखडलेल्या वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून लक्ष वेधले आहे.केलेली आहे.जिल्ह्यातील वैभववाडी ते कोल्हापूरला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तुमच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मी हे पत्र
लिहित आहे. हा प्रकल्प प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असून त्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.प्रस्तावित रेल्वे मार्ग केवळ वैभववाडी ते कोल्हापूरला जोडणार नाही तर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलाही थेट जोडेल. यामुळे या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेलच
शिवाय लोकांना वाहतुकीच्या चांगल्या सुविधाही उपलब्ध होतील.मात्र, या प्रकल्पाचे काम अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे रखडले आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याची या
भागातील जनता आतुरतेने वाट पाहत असून, काम पुन्हा सुरू होण्याची वेळ आली आहे. वैभववाडी ते कोल्हापूरला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्यासाठी कृपया कार्यवाही करावी,
अशी माझी विनंती आहे. याचा फायदा या भागातील जनतेला तर होईलच शिवाय देशाच्या सर्वांगीण विकासाला हातभार
लागेल.असे आमदार नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.