*मत्स्य विभाग ताफ्यात रामभद्रा गस्ती नौका दाखल ,अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी सर्वप्रथम अत्याधुनिक स्पीडबोट प्राप्त*
__पावसाळी अधिवेशनात राज्याचे मत्स्योद्योग मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे रामभद्रा नावाची पहिली अत्याधुनिक गस्ती नौका रत्नागिरी मत्स्य विभागाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या स्पीडबोटला ४०० अश्वशक्तीचे इंजिन असून ताशी २२ सागरी मैल इतक्या वेगाने ती समुद्रात धावणार आहे.या स्पीडबोटीमुळे खरच परराज्यातील फास्टर ट्रॉलर्स, अनधिकृत पर्ससीन नौका आणि बेकायदेशीर एलईडी मासेमारीला पूर्णपणे लगाम घातला जाणार का हा प्रश्न कायम आहे.परराज्यातील फास्टर ट्रॉलर्सनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महिनाभरापूर्वी मत्स्य विभागामध्ये लाकडी गस्तीनौकेचा पाठलाग करून मत्स्य पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न या ट्रॉलर्सनी केला होता. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी मत्स्य विभागाला अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी सर्वप्रथम अत्याधुनिक स्पीडबोट प्राप्त झाली आहे. www.konkantoday.com