*बिबट्याचा मानवी वस्तीवर वावर ,उमरे ग्रामस्थ भयभीत*
___एकीकडे जिल्ह्यात ठिकठिकाणी बिबट्याचा मानवी वस्तीवर वावर होत असताना आता रत्नागिरी शहरानजिकच्या उमरे व आसपाच्या भागातील ग्रामस्थ सध्या भीतीच्या छायेत आहेत. कारण सध्या येथील ग्रामस्थांना गुरगुरण्याचे आवाज येत असून पंजाचे ठसेही आढळत आहेत. कदाचित हा आवाज बिबट्याचा असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.या भागात दरवर्षी बिबट्याचा वावर आढळतोच. मात्र यंदा लागोपाठ ६ दिवस बिबट्यांचा आवाज ग्रामस्थांना ऐकायला येत आहे. त्यामुुळे सुर्यास्त झाल्यावर गावाच्या रस्त्यावर निरव शांतता दिसत आहे. एकीकडे बिबट्या मानवी वस्तीत शिरून गोंधळ घालत असताना आता शहरानजिकच्या गावातही बिबट्याचा वावर पहायला मिळत आहे. त्यामुळे वेळेआधीच वनविभागाने या भागात आवश्यक खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. www.konkantoday.com