
*न्यायालय परिसरातून महिला वकिलाची दुचाकी चोरीला*
___रत्नागिरी जिल्हा न्यायालय परिसरातून महिला वकिलाची दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या महिला वकिलाकडुन आपली दुचाकी कोणी नेली, या बाबत रत्नागिरी जिल्हा . ७ जानेवारी रोजी सकाळी महिला वकील नेहमीप्रमाणे कामानिमित्त न्यायालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी आपली दुचाकी न्यायालयाच्या आवारात उभी करून ठेवली होती. काम आटपून या महिला वकील आपली गाडी घेण्यासाठी आल्या असता त्यांना आपली दुचाकी आढळली नाही. www.konkantoday.com