
सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर,पत्नी मोहिनी वाघ यांनीच त्यांच्या हत्येची सुपारी दिली
. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस तपासानुसार, त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती.भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस तपासानुसार, त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती.9 डिसेंबर 2024 रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले. त्यानंतर चालत्या गाडीतच त्यांची तीक्ष्ण शस्त्रांनी हत्या करण्यात आली.
ज्यात त्यांच्या शरीरावर 72 वार आढळले. मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून देण्यात आला होता.पोलीस तपासात उघड झाले की, मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते आणि सतीश वाघ हे त्यात अडथळा ठरत होते. त्यामुळे मोहिनी वाघ यांनी पाच लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांच्या पतीची हत्या घडवून आणली