*निरामय हॉस्पिटल लवकरच सुरू करणार- ना. उदय सामंत*
______कोरोनाच्या तिसर्या लाटेत कोविड केअर सेंटरसाठी शासनाने निरामय रूग्णालय सुरू करण्यासाठी पाहणी केली होती. मात्र त्यानंतर कोरोनाची लाट ओसरली आणि हा विषय मागे पडला. बुधवारी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना निरामय हॉस्पिटलबाबत आनंदाची बातमी दिली आहे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने पुढाकार घेतला असून राज्य सरकारने या विषयात सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. याबाबत गुरूवारीच संस्थेच्या पदाधिकार्यांसमवेत चर्चा करणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.www.konkantoday.com