*टिकेत रेल्वे रूळावर आढळला अनोळखी पुरूषाचा मृतदेह*

____कोकण रेल्वे मार्गावरील टिके येथे रेल्वे रूळावर अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला. ही घटना २ फेब्रुवारी २०२४ रोजी उघडकीस आली. रेल्वेमार्गावर ट्रॅकमन मोहन अमृत पवार (५१, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) यांच्या निदर्शनास हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार मोहन यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत खबर दिली.मोहन पवार हे २ फेब्रुवारी रोजी रेल्वे ट्रॅकची देखरेख करत होते. टिके येथे ट्रॅकची तपासणी करत असताना ४० मैल दगडाशेजारी पुरूषाचा मृतदेह पवार यांना आढळून आला. मृताचे अंदाजे वय ४० ते ४५ असल्याचे सांगण्यात आले. केस पिकलेले असून दाढी वाढलेली आहे. कमरेला निळ्या रंगाची जीन्स, अंगात मळकट सफेद हिरवट पट्टे असलेले टिशर्ट परिधान केले आहे. या मृताची अद्याप ओळख पटलेली नसून कुणाला काही माहिती असल्यास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button