चिपळूण नगर परिषदेकडून कारवाई करण्याची मागणी*
*__अशोका गॅस सर्व्हिसेस या कंपनीकडून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याकरिता चिपळुण शहरातील रस्त्याची खोदाई सुरू करण्यात आली आहे. या कंपनीच्या कामगारांकडून शहरातील रस्ते जवळपास चार ते पाच फूट खोल खोदण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी कठीण डांबरीकरण केले आहे तेथे कॉम्प्रेसर मशिनने ते खोदण्यात येत आहेत. या खड्ड्यात पाईप टाकल्यावर फक्त माती ओढून घेतली जात आहे. ती सुद्धा व्यवस्थित ओढलेली दिसून येत नाही. याबाबत अशोका गॅस सर्व्हिसेसच्या प्रतिनिधीला विचारणा केली असता आम्ही फक्त माती ओढून हे खड्डे बुजविणार आहोत. डांबरीकरण वगैरे बाबी नगर परिषद करेल, कारण आमच्या कंपनीकडून होणारी सर्व रक्कम पूर्वीच नगर परिषदेकडे भरणा केेलेली आहे. www.konkantoday.com