चिपळुणातील सर्वेक्षणात ८५ हजार ७२२ कुटुंबांची माहिती संकलित,तब्बल २१ हजार ४३२ घरे बंद*

*_मराठा समाज आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर चिपळूण तालुक्यातही मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात तब्बल २१ हजार ४३२ घरे बंद आढळून आली, तर ३७१ कुटुंबांनी आपली माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे प्रत्यक्षात ८५ हजार ७२२ कुटुंबांची माहिती संकलित करण्यात प्रगणकांना यश आले आहे.मराठा आरक्षणाला आरक्षण मिळावे म्हणून मोठा लढा दिला जात आहे. याच धर्तीवर २३ जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले. मुळातच २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार तालुक्यात ६६ हजार ९५९ कुटुंब असल्याचे दिसून येत होते. मात्र यात मोठी वाढ झाल्याचे सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button