खेडशी येथे दुचाकीच्या धडकेत महिला जखमी*

*___रत्नागिरी-हातखंबा रस्त्यावरील खेडशी येथे मोटारसायकलच्या धडकेत पादचारी महिला जखमी झाली. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. मानसी महेंद्र देसाई (३६) असे या महलेचे नाव आहे. याप्रकरणी मानसी यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी मोटारसायकल चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.मानसी देसाई या ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता खेडशी नाका येथे रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी हातखंबा दिशेने जाणार्‍या मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याने या अपघातात मानसी यांना दुखापत झाली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button