*कोरे पार्सल सेवेद्वारे हंगामातील पहिल्या हापूस पेट्या रवाना*
__सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारानी आपला हापूस आंबा ग्राहकांपर्यंत सुरक्षित तसेच जलदगतीने पोहोचवून त्यांना त्याचा स्वाद घेता यावा यासाठी कोकण रेल्वेने रेल्वे पार्सल सेवा सुरू केली आहे. या सुविधेद्वारे हापूस आंब्याच्या चालू हंगामातील पहिल्या तीन पेट्या मंगळवारी गुजरातमधील वेरावल येथे वेरावल एक्स्प्रेसने रवाना करण्यात आल्या.कोकण रेल्वेच्या रेल्वे पार्सल सेवेद्वारे हापूस आंबा पेटया पाठवण्याचा लाभ मिळाला आहे. येथील आंबा बागायतदारांनी गेल्या काही वर्षापासून पसंती दिली आहे. रत्नागिरी रेल्वेस्थानकावरून दिल्ली, पंजाब, गुजरात, राजस्थान, चंदीगड, मध्यप्रदेश, कर्नाटक, केरळ आदी राज्यांत थेट रेल्वे सेवा आहे. त्यामुळे येथील रेल्वेस्थानकावरून हापूस आंबा हंगामात तेथील ग्राहकांना बाजारात उपलब्ध करून देण्यात सोयीस्कर झाले आहे. याचबरोबर रेल्वे पार्सल सेवा दर किफायतशीर असल्याने होलसेल व्यापारी यांनी कोकण रेल्वेला पसंती दिली आहे.कोरेच्या पार्सल सेवेमार्फत मंगळवारी ७० किलोच्या आंबा पेट्या गुजरातसाठी रवाना झाल्या. रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील रेल्वे पार्सल टेबलचे वैभव तळेकर यांच्या अनुश्री पार्सल सेवेच्या माध्यमातून या हापूस आंबा पेट्या वेरावल येथील व्यापार्यांना पाठवण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com