*कातळशिल्प सनियंत्रण समितीत सुधीर रिसबुड*
_कातळशिल्प सनियंत्रणासाठ स्थापन करण्यात आलेल्या समितीत सुधीर रिसबुड यांची विशेषतज्ञ म्हणून सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, पुरातत्व विभागचे सहाय्यक संचालक, पर्यटन विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. गोवा राज्याचे पर्यटन सचिव, अन्य विभागाचे राज्यस्तरीय अधिकारी अशा १७ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. पुरातत्व विभागाच्या निकषाप्रमाणे स्थळ व्यवस्थापन आराखडा तयार करणे, योजनेनुसार वारसा स्थळांचे जतन संवर्धन करणे, वार्षिक अहवाल सादर करणे, शाश्वत पर्यटन विकासासाठी उपाययोजना करणे, आदी जबाबदार्या समितीकडे सोपविण्यात आल्या आहेत. www.konkantoday.com