*मॉरिस नरोना चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्रांना भेटला; राऊतांकडून फोटो पोस्ट*
___ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची स्वयंघोषित नेता मॉरिस नरोना याने फेसबुक लाईव्हवेळी गोळ्या झाडून हत्या केली आहे. यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खळबळजनक आरोप केला आहे.संजय राऊत यांनी मॉरिस व एकनाथ शिंदे यांचा भेटतानाचा फोटो पोस्ट केला आहे. नरोना हा चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर गेला होता. तिथे शिंदे यांनी त्याला आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस नरोना चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर गेला होता. मुख्यमंत्री त्याला भेटले. मॉरिस याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले! (वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्याने अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.www.konkantoday.com