
अल्पवयीन युवतीचे अपहरण करून बलात्कार : आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी
———————————————-
खेड -अल्पवयीन युवतीचे अपहरण करून निर्जनस्थळी नेवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश बबन जाधव (४० , रा. दुधेरे आदिवासीवाडी , ता. मंडणगड ) याला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एल. निकम यांनी शुक्रवार ता. ४ मार्च २०२२ रोजी भा.द.वि.कलम ३७६(२) अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी,पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष शिक्षा तसेच पोस्को (१०) अंतर्गत सहा वर्षे सक्तमजुरी,पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. हि घटना मंडणगड दुधेरे येथील निर्जनस्थळी ता. २ ते ९ सप्टेंबर २०१७ या मुदतीत घडली. मंडणगड तालुक्यातील दुधेरे आदिवासीवाडीतील निर्जनस्थळी हि घटना घडल्यानंतर आरोपी प्रकाश बबन जाधव यांच्या विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात भा. द वि.कलम ३६३, ३७६ (२), व पॉस्को (९)(१०) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. मात्र हा गुन्हा सत्र न्यायालयाशी संबंधित असल्याने हा खटला खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात येऊन खटल्याची सुनावणी सुरू झाली.तपासीक अंमलदार पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एच. डी. मोरे यांनी काम करून उत्तम तपास केला. त्यांना सहाय्यक म्हणून हवालदार श्री. मरचंडे व श्री.पवार यांनी काम पाहिले.सुनावणीदरम्यान ९ साक्षीदार तपासण्यात आले.सरकारी वकील सौ.मेघना नलावडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश निकम यांनी आरोपीला दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
www.konkantoday.com