
रत्नागिरी शहरातील नाचणे रोडवर इलेक्ट्रिक कारने अनेक दुचाकीना उडवले
रत्नागिरी शहरातील नाचणे रोडवर दैवज्ञ भवन समोर गुरुवारी सायंकाळी मोठा अपघात झाला. भरधाव कारने आधी चारचाकी, दुचाकी नंतर पादचारी महिलेला धडक दिली. धडक दिल्यानंतर कार पोलावर जाऊन आदळली.अपघातात नंतर धडक देणारी कार विरुद्ध दिशेला वळली. चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने सदर अपघात झाल्याची माहीती घटनास्थळावरून मिळत आहे. सदरची कार जैन नामक व्यक्तीची असल्याचे कळते अपघातानंतर या मार्गावर मोठी गर्दी झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
www.konkantoday.com