*भाजपा महिला जिल्हाउपाध्यक्षा यांचे सोबत गैरवर्तनाची तक्रार*
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ.प्रियल प्रशांत जोशी यांनी राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या सौ.अर्चनाताई देसाई,महिला प्रदेश महामंत्री सौ.मंजुषा कुद्रिमोती,प्रदेश महिला सचिव सौ.शिल्पा मराठे,जिल्हाध्यक्षा सौ.सुजाता साळवी यांचे सूचने नुसार भाजपा झेंडे लावलेवरून झालेल्या दमदाटी विरोधात मा.जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कडे तक्रार अर्ज दिला. दि.३०/०१/२०२४ रोजी कारवांचीवाडी येथे सौ.जोशी यांचे घरी माजी आमदार बाळासाहेब माने यांचे अध्यक्षतेखाली बूथ क्लस्टर बैठक होती त्यासाठी येणाऱ्या मार्गावर भाजपा झेंडे लावण्यात आले होते,हे झेंडे का लावण्यात आले ह्याचा जाब दि.३१/०१/२०२४ रोजी रोहन शिंदे,विनोद झाडगांवकर यांनी विचारला व त्यावेळी सौ.जोशी यांचे सोबत गैरवर्तन करण्यात येऊन अर्वाच्य शिवीगाळ करण्यात आली असे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले.महिलांशी व त्यातही महिला पदाधिकारी असूनही त्यांचे सोबतचे हे कृत्य अत्यंत निंदनीय होते.माजी खासदार निलेशजी राणे साहेब यानाही या घटनेची खबर देण्यात आली .या दहशतीची दखलही राष्ट्रीय व प्रदेश महिला पदाधिकारी यांनी त्वरित घेतली व रत्नागिरी दौऱ्यात सौ.प्रियल जोशी यांचे घरी भेट दिली व धीर दिला. या घटनेची माहिती मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व राज्य महिला आयोग याना देण्यात येणार असून त्वरित तक्रार पत्र मा.जिल्हा पोलिस अधिक्षक याना देण्याच्या सूचना केल्या. तक्रार अर्ज देताना भाजपा जिल्ह्याध्यक्ष राजेशजी सावंत,सरचिटणीस सतेज नलावडे,युवा प्रदेश सचिव विक्रम जैन,महिला जिल्हा सरचिटणीस सौ.वर्षा ढेकणे,सौ रायकर,तालुका सरचिटणीस ओंकार फडके,दादा ढेकणे,बाबू सुर्वे,संकेत कदम इत्यादी उपस्थित होते.www.konkantoday.com