*बाबा सिद्दीकी यांचा राजीनाम्याचा निर्णय अत्यंत निराशाजनक आणि सर्वात खेदजनक*

_महाराष्ट्र काँग्रेसला धक्का देत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सिद्दीकी यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.सिद्दीकी यांच्या निर्णयानंतर माजी मंत्री आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. पक्ष अडचणीत असताना सिद्दीकी यांनी पक्ष सोडल्याने वर्षा गायकवाड यांनी त्यांना लक्ष्य केले. सिद्दीकी म्हणाले की, मी तरुण असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि आज ४८ वर्षांनी पक्ष सोडत आहे. माझा हा प्रवास खूप छान होता. मी आज माझ्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. अजून अनेक गोष्टी आहेत ज्या आता सांगणे योग्य होणार नाही. काही गोष्टी या न सांगितलेल्याच बऱ्या असतात. माझ्या या प्रवासात ज्या-ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला, त्यांचा मी आभारी आहे.सोशल मीडियावर पोस्ट करत वर्षा गायकवाड यांनी म्हटले, “तुमच्यावर काँग्रेस पक्षाने ठेवलेला विश्वास, दिलेला एवढा सन्मान असे असताना देखील तुम्ही पक्षातून बाहेर जात आहात हा तुमचा निर्णय अत्यंत निराशाजनक आणि सर्वात खेदजनक आहे. आपला देश एका नाजूक वळणावर असताना आणि संपूर्ण काँग्रेस परिवार भाजपाने केलेल्या लोकशाहीच्या हत्येविरुद्ध लढण्यात व्यग्र असताना तुम्ही हे करण्याचे निवडले आहे. हे अगदी खरे आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्वकाही सांगणे योग्य नसते. असो काँग्रेस पक्ष आपल्या शहराची, देशाची सेवा प्रामाणिकपणे आणि समर्पणाने करण्याच्या वचनबद्धतेवर ठाम आहे. या प्रकारच्या घटना आमच्या मार्गात अडथळा आणू शकत नाहीत. आमचे एकच लक्ष्य आहे, सर्वांसाठी न्याय.”www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button