*कर्मचार्यांविना फिरते पशु दवाखान्याचे काम ठप्प*
_पशुपालकांच्या आजारी पशुंवर शासनाकडून फिरता दवाखाना ही उपचाराची सुविधा रत्नागिरी जिल्ह्यातही उपलब्ध झाली. मंडणगड, खेड आणि लांजा या तालुक्यासाठी उपलब्ध असलेली सुविधा मात्र सध्या आवश्यक पशुधन अधिकार्यांविना अखेरच्या घटका मोजत आहे. शासनाकडूनही त्यासाठी आवश्यक कर्मचारीवर्ग नियुक्तीकडे दखल घेतल जात नसल्याने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागही अगतिक बनला आहे.दुर्गम आणि डोंगराळ, आदिवासी भागासाठी फिरता पशुवैद्यकीय दवाखाना ही सुविधा सुरू करण्यात आली. ज्या भागात दळणवळणाच्या अपुर्या सुविधा आहेत, अशा भागासाठी ही सुविधा फायदेशीर ठरणारी आहे. जिल्ह्यातील मंडणगड, खेड व लांजा या तालुक्यांसाठी ही फिरता पशुवैद्यकीय दवाखाना सुविधा सुमारे सन २००६-०७ च्या दरम्यान सुरू करण्यात आल्याचे सांगितले जाते. या फिरत्या दवाखान्यामुळे सुरूवातीला असंख्य शेतकर्यांच्या दारात आजारी पशू रूग्णांवर उपचाराची सुविधा मिळाली. मात्र, सध्या डॉक्टरांविना फिरता दवाखाना जाग्यावर उभा करण्याची वेळ जि.प. पशुसंवर्धन विभागावर आली आहे. www.konkantoday.com