
*ओल्या काजूला दिल्ली, बेंगलोरसह राज्यात मागणी*
_प्रतिकूल हवामानामुळे काजूचे उत्पन्न घटल्याचे चित्र आहे.त्यातून हापूसप्रमाणे काजूच्या जमाखर्चाचा मेळ बसताना दिसत नाही. यात सुक्या काजू बियांपेक्षा ओल्या काजूगरांना काहीसा जादा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी व बागायतदारांकडून सुक्या काजू बियांपेक्षा ओले काजूगर विक्री करण्याकडे कल वाढला आहे. चविष्ट अन् पौष्टिक असलेल्या ओल्या काजूगरांचा दर चांगलाच वधारला आहे. सद्यःस्थितीमध्ये प्रतिकिलो आठशे-हजार रुपयांपासून बाराशे रुपयांपर्यंत काजूगराला दर मिळत आहे. त्यातून, काजूचे अर्थकारण बदलत चालल्याचे चित्र आहे. दिल्ली, बेंगलोरसह राज्यात मागणी वाढली आहे. www.konkantoday.com