इनोव्हा कारच्या धडकेत टेम्पाचालकाचा जागीच मृत्यू*

*_गोवा महामार्गावरील महाड तालुक्यातील माहिोपरे हद्दीत लघुशंकेसाठी उतरलेल्या एका टेम्पोचालकाला इनोव्हा कारची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास घडली. फुलचंद राजाराम यादव (रा. उत्तरप्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे. तो टेम्पो (एमएच-१४ के क्यू-८७१४) घेवून मुंबई येथून गोवा येथे जात असताना रस्त्याकडेला टेम्पो थांबवून लघुशंका करून पुन्हा टेम्पोत बसत होता. तेव्हा इनोव्हा क्रिस्टा कारची (एमएच-१२ आर वाय-५४३०) धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पोचालकांचा जागीच मृत्यू झाला. या बाबत क्लिनर चंद्र बहाद्दूर ईश्‍वर यादव महाड यांनी शहर पोलिसांत तक्रार नोंदवली. महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button