
खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर वर्णी लागत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती.राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनत असल्याची टीका राऊत यांनी केली होती. राऊत यांची ही टीका ताजी असतानाच आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.राऊत आणि राज्यपाल यांच्यात तब्बल १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले राज्यपाल आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. खूप दिवस त्यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे आज त्यांची सदिच्छा भेट घेतली, असं राऊत म्हणाले.
www.konkantoday.com