
स्व. बाळासाहेबांची ती खुर्ची सन्मानाने मातोश्रीत आणून ठेवा, विद्याधर पेडणेकर यांची मागणी.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विद्यमान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना या पक्षाचा कारभार सर्वानुमते सोपवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन ही संकल्पना आणली. मात्र सध्याचे गद्दार शिवबंधन बांधून तोर्यात मिरवत आहेत. हे शिवबंधन उद्धव साहेबांनी बांधलेले आहे. हे लक्षात ठेवा. मूळ संघटनेतून बाहेर गेलात तर शिवबंधन काढून टाका. आता तुम्ही आणि तुमच्या नेत्याने जे प्रतिक आणले असेल ते हातात लावा आणि मिरवा, अशी खरमरीत टीका एकनिष्ठ उबाठा सेनेचे कार्यकर्ते व सागवे उपविभाग संपर्कप्रमुख विद्याधर पेडणेकर यांनी केली आहे.
श्री. पेडणेकर यांनी शिंदे शिवसेनेतील प्रवेशानंतर माजी आमदार राजन साळवी यांच्यावर तर थेट खरमरीत टीका केली आहे. मुंबईस्थित पेडणेकर हे तेथे रिक्षा संघटनेचे पदाधिकारीदेखील आहेत.आता राजन साळवींना सांगणे आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वर्गीय बाळासाहेबांची खुर्ची ठेवली आहे ती सन्मानाने मातोश्री या पवित्र मंदिरात आणून ठेवावी. नाहीतर नाईलाजाने आम्हा शिवसैनिकांना आणण्यास भाग पाडू नका, असे आव्हानही उपविभाग संपर्कप्रमुख विद्याधर पेडणेकर यांनी दिले आहे.www.konkantoday.com