*विरोधकांना वाटले होते शिवसेना संपेल. आजची गर्दी याला उत्तर आहे-**उद्धव ठाकरे*
__चिपळूण हे माझे आजोळ आहे. आम्ही नाती जपणारे आहोत. सध्या संकटे आहेत; मात्र प्रत्येक संकट हे संधी घेऊन येते, असे माझ्या आजोबांनी शिकवलेले आहे.आम्ही पक्षप्रमुख नाही असे म्हणणार्यांनी २०१४ मध्ये माझा पक्षप्रमुख म्हणून पाठिंबा का घेतला? तेव्हा आमची घराणेशाही दिसली नाही का ? आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे; मात्र देशातील आणखी एक मोठे न्यायालय आहे, ते जनतेचे न्यायालय आहे. आम्ही पाप केलेले नाही. विरोधकांना वाटले होते शिवसेना संपेल. आजची गर्दी याला उत्तर आहे. बाळासाहेबांचे विचार मी सोडलेले नाहीत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. येथील इंदिरा गांधी संस्कृती केंद्रासमोरील मैदानाच ठाकरे गटाची सभा पार पडली. या वेळी उद्धव ठाकरे बोलत होते.www.konkantoday.com