
आमच्या डोक्यात विकास कामे यांची हवा नक्कीच आहे आणि ती कायम राहील -आमदार शेखर निकम
शिरगाव…गेली पाच वर्ष मतदार संघात विविध विकास कामे केली पण डोक्यात कधी हवा गेली नाही आणि कोणाच्या बोलण्याने आपल्याला भोके पडणार नाहीत पण आमच्या डोक्यात विकास कामे यांची हवा नक्कीच आहे आणि ती कायम राहील कारण आम्हाला विकास करायचा आहे असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले
शिरगाव मधील युवा ग्रूप मधील 40 तरुणांनी बाबू साळवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे तरुणाची एक मोठी फळी उभी राहिली उद्या विधान सभा निवडणूक लागतील आणि अजित दादा यांनी कोणालाही उमेदवारी द्यावी मागील पाच वर्षापूर्वी देवरूख मतदार संघातून दहा हजारचे लीड घेतले होते पण यावेळी 25000 चे लीड घेणार मग कोणीही कितीही मातब्बर उमेदवार असला तरी हे करून दाखविनारच तसेच अजित पवार यांच्या माध्यमातून पाझर तलाव सारखी विविध कामे मार्गी लावली आहे तुम्हा कोणाला न सांगता विकास कामासाठी दादाच्या बरोबर गेलो आहे पण आजच्या राजकारणवर बोलणे अवघड झाले आहे कारण काल पर्यंत एकमेकाच्या विरोधात बोलणारे आज एकमेकांना पेढा भरवत आहे पण अनिल शिंदे आणि जयंत शिंदे यांनी शिरगाव मधील तरुण यांच्यासाठी व्यायाम शाळा कशी उभी राहील यासाठी प्रयत्न करावे तर भावी आमदार निवडून आणण्याची जबाबदारी खेर्डी तील आबू ठसाले यांची आहे तर बाबू साळवी यांना किंग मेकर बनविण्याची जबाबदारी युवा पिढी वर असून शिरगाव मधील युवकाच्या पाठीशी कायम उभे राहण्याचे अभिवचन आ शेखर निकम यांनी केले
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी गटात आ शेखर निकम यांच्या उपस्थितीत शिरगाव येथील विविध पक्षातील युवक आणि महिलांनी पक्ष प्रवेश केला पूर्व विभागातील हा सर्वात मोठा पक्ष प्रवेश झाला यावेळी आ शेखर निकम,जेष्ठ नेते दादा साळवी,माजी उपसभापती सूर्यकांत खेतंले,माजी प स सदस्य रमेश राणे,राष्ट्रवादी तालुकाद्याश आबू ठसाले,जिल्हाध्यक्ष अजिंक्य आंब्रे ,युवक अध्यक्ष नीलेश कदम,उपाध्यक्ष प्रत्तिक सुर्वे,महिला तालुकाध्यक्ष सो जागृती शिंदे,माजी प स सदस्य बाबू साळवी,शिरगाव सोसायटी चेअरमन जयंत शिंदे,माजी सरपंच अनिल शिंदे,माजी सरपंच नीलेश कोलगे,माजी सरपंच मधुकर इंदुलकर, शिरगाव तंटामुक्त अध्यक्ष लियाकत कुटरेकर,माजी उपसरपंच बाबा कूटरेकर,ग्रामपंचायत सदस्य नीलेश कोलगे,रूचिरज भागडे,प्रवीण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवर यांचे शिरगाव युवा गृपु यांनी स्वागत केले
यावेळी उपस्थित मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिरगाव युवा ग्रूप मधील राजेंद्र मेस्त्री,मनोज सुतार,जयेश पांचाळ,स्वप्नील सुतार,शुभम डेरवणकर, सुमित डेरवणकर,रितेश डेरवणकर,अभिषेक डेरवणकर,ओंकार डेरवणकर, गोरेश डेरवणकर,संजय पांचाळ, आमीत पांचाळ,दिनेश फके,रोहित गोटल,संदेश मेस्त्री,मनोज नादकस्कर,आदित्य शिरकर,साहिल मेस्त्री,आर्यन मेस्त्री,रोहन यादव ,आयुष सुतार,स्वप्नील मोरे,प्रशांत मुंढेकर,सुरेश फाळके, पार्थ सुतार,अनिकेत मेस्त्री,संदेश तांबुटकर आदी युवकांनी आ शेखर निकम यांच्या उपस्थित राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तसेच शिरगाव परिसर मधील हा सर्वात मोठा पक्ष प्रवेश झाला आहे त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे तर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी शिरगाव युवा ग्रूप यांनी अथक परिश्रम घेतले
पत्रकार निसार शेख यांच्या सॉरी या लघुपटाने अनेकांची मने जिंकली आणि सध्या सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरली आहे याबाबत आ शेखर निकम यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन विशेष सन्मान केला
www.konkantoday.com