*मनसे भाजपसोबत जाणार?*
_मनसे भाजपसोबत जाणार अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा होतीच, त्यात आता बंद दाराआड झालेल्या बैठकीची भर पडली आहे. मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई आणि संदीप देशपांडे या तिघांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि पुन्हा मनसे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं.मनसे नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरूवारी तर सोमवारी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचं समोर येतंय. आता भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी आणि मनसे ही नवी युती होणार का? ही युती झाली तर काय फॉर्म्युला असेल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचं लोकसभेत मिशन 45 आहे, त्यासाठी सर्वच पक्षांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची रणनीती आहे. त्यात लोकसभेत मनसैनिक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसू शकतात.www.konkantoday.com