
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीमे बाबतचे प्रशिक्षण..*
*…….रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे नुकतेच राष्ट्रीय जंतनाशक मोहिमे अंतर्गत कार्यक्षेत्रातील शाळांचे शिक्षक, आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सदर मोहीम संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात होणार आहे या बाबत करावयाची कार्यवाही आणि त्या साठी ची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी दिली या वेळी प्राथमिक शाळा तसेच मध्याकिम शाळांतील शिक्षक (नोडल अधिकारी) सर्व अंगणवाडी सेविका सर्व आशा सेविका गट प्रवर्तक श्रीमती आढाव आरोग्य सेवक श्री. किरण झगडे, आरोग्य आरोग्य सेविका श्रीमती सावंत, श्रीमती गावडे, cho श्रीमती ठाकरे, श्रीमती शिर्सेकर, परिचर श्री . घाणेकर या प्रशिक्षणासाठी उपस्थिती होते.