दुसऱ्यांच्या घरात भांडणे लावण्याचे एकमेव काम संजय राऊत करतात-**नितेश राणे*
*_दुसऱ्यांच्या घरात भांडणे लावण्याचे एकमेव काम संजय राऊत हे करतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात त्यांनी वाद लावले. ते घर फोडले,पक्ष फोडला. आता शरद पवार यांचा पक्ष फोडला.त्यानंतर काँग्रेस पक्ष त्यांचे टार्गेट आहे. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जे बोलले त्याला माझे समर्थन आहे. उद्धव ठाकरे पदासाठी व आमदारकीसाठी पैसे घेतात. हा आरोप यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रंगशारदा येथील बैठकीत केला होता असेही ते यावेळी म्हणाले. कणकवली येथे प्रसिद्धी माध्यमांशी आज, बुधवारी त्यांनी संवाद साधला. राणे म्हणाले, अपेक्षे प्रमाणे ज्यांनी स्वतःच्या कष्टाने आणि घामाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवली त्या अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना हा निर्णय सुखावणारा होता तसा तो संजय राऊत यांनाही आनंद देणारा आहे. संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांचे होवू शकले नाहीत. त्यामुळे ते कोणाचेच होणार नाहीत. आता त्यांचा काँग्रेस पक्ष फोडण्यावर डोळा आहे. www.konkantoday.com